Pimpri corona News: गुड न्यूज! शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

Pimpri corona News: गुड न्यूज! शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

127 नवीन रुग्णांची नोंद, 129 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात आज कोरोनाचा एकही मृत्यू झाला नाही. हे आशादायक चित्र आहे. शहराच्या  विविध भागातील 127 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या  129 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 95 हजार 563 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 92 हजार 83 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1737 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 714 अशा 2451 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 752 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1042 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *