Pimpri corona News: शहरात आज 103 नवीन रुग्णांची नोंद, 98 जणांना डिस्चार्ज, 3 मृत्यू

Pimpri corona News: शहरात आज 103 नवीन रुग्णांची नोंद, 98 जणांना डिस्चार्ज, 3 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या  विविध भागातील 103 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या  98 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 95 हजार 436 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 91 हजार 954 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1737 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 714 अशा 2451 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 748 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 599 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.  

शहरातील दोन आणि पालिका हद्दीबाहेरील एक अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात चिखलीतील 58 वर्षीय पुरुष, 73 वर्षीय महिला आणि पालिका हद्दीबाहेरील दौड येथील 72 वर्षीय महिला रुग्णाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *