Pimpri news: मनसे चित्रपट सेनेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar- महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली कला, नाट्य, चित्रपट सृष्टीतील कलाकार, कलावंत, तंत्रज्ञांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर चित्रपट सेनेच्या वतीने सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
२१ ते २५ डिसेंबर या दरम्यान पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्यातील कला, नाट्य, चित्रपट सृष्टी संबंधित सर्व कलाकार, कलावंत, तंत्रज्ञांची महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेत विनामूल्य सदस्य नोंदणी होणार आहे.
यावेळी मनसे शहरध्यक्ष सचिन चिखले , मनसे विद्यार्थी सेनेचे शहरध्यक्ष हेंमत डांगे , दत्ता घुले, तुकाराम शिंदे , शिवनाथ दिलपाक, दिपक भालेराव, प्रसाद खैरे , रोहन पवार, प्रदिप गायकवाड, अनिल भुजबळ आदि उपस्थित होते.










Leave a Reply