Pimpri Corona News: शहरात आज 122 नवीन रुग्णांची नोंद, 98 जणांना डिस्चार्ज, 10 मृत्यू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 122 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 98 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 95 हजार 70 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 91 हजार 707 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1733 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 713 अशा 2446 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 719 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1674 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील सात आणि पालिका हद्दीबाहेरील तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिखलीतील 62, 43 वर्षीय पुरुष, मोशीतील 59 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 76 वर्षीय पुरुष, रावेत येथील 82 वर्षीय पुरुष, चिंचवडमधील 78 वर्षीय महिला, रहाटणीतील 45 वर्षीय महिला, बारामतीमधील 62वर्षीय पुरुष, तळेगाव दाभाडे येथील 61 वर्षीय पुरुष आणि कोंढवा येथील 78 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply