Maval news: मावळातील गावांच्या विकासासाठी तीस कोटींचा निधी द्या ; आमदार शेळके यांची केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी
Pckhabar- मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांच्या विकासासाठी तीस कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशा मागणीचे व प्रस्तवित कामांचे पत्र केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना दिल्ली येथे भेट घेऊन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिले.
‘ग्रामीण विकास साधण्यासाठी जी कामे आपण सुचविली आहेत, त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल,असे आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.










Leave a Reply