Dehu news: मधुसूदन बर्गे यांनी स्वीकारला नगरपंचायतीचा पदभार

 

Dehu news: मधुसूदन बर्गे यांनी घेतला नगरपंचायतीचा पदभार

Pckhabar- देहू नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी स्वीकारला. देहू ग्रामपंचायतीचे 8 डिसेंबर रोजी नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. राज्य सरकारने बर्गे यांच्याकडे प्रभारी म्हणून पदभार दिला आहे. निवडणुकीपर्यंत हा पदभार असणार आहे.

यावेळी माजी सरपंच कांतिलाल काळोखे, ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी, गाव कामगार तलाठी अतुल गीते, माजी जिल्हा परिषद सदस्य माउली काळोखे, माजी उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे उपस्थित होते.

मधुसूदन बर्गे म्हणाले, ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे विकासकामांना चालना मिळणार आहे. महत्त्वाच्या विकास कामांना प्राधान्य दिले जाईल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *