Talegaon Dabhade news: विकास कामांना गती देण्यासाठी नगरपरिषदेवर मोर्चा

 

Talegaon Dabhade news: विकास कामांना गती देण्यासाठी नगरपरिषदेवर मोर्चा

Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून शहरातील विविध भागात करण्यात येणा-या विकासकामांना गती देण्यात यावी. या मागणीसाठी जनसेवा विकास समिती. तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या वतीने गुरूवारी नगर परिषदेवर मोर्चाचे आयोजन करून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

  या मोर्चात विरोधी पक्षनेते गणेश काकडे, गटनेते किशोर भेगडे,गणेश खांडगे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, अरुण माने, मंगल भेगडे, संगीता शेळके, हेमलता खळदे यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, कृष्णा कारके, यादवेंद्र खळदे, सुनिता काळोखे, आशिष खांडगे, कौश्यल्या काळोखे, रुपाली दाभाडे, सुर्यकांत काळोखे, निशा पवार, विना करंडे, अर्चना दाभाडे सह अनेकजण उपस्थित होते.

मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना दिलेल्या निवेदनामध्ये शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा, भुयारी गटर योजने मुळे खराब झालेले रस्ते,हिंदमात रेल्वे भुयारी पुलाखालील अपूर्ण  काम, शहरारातील उद्याने, रस्ते आदींच्या कामाकडे विशेष लक्ष देण्यात यावे. अशी मागणी निवेदनात करून नगर परिषदेच्या सर्व सभा दरमहा सभागृहात घेण्यात याव्यात. असे  निवेदनात मनामूद करण्यात आले. यावेळी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनाचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *