Pimpri Corona News: शहरात आज 171 नवीन रुग्णांची नोंद

Pimpri Corona News: शहरात आज 171 नवीन रुग्णांची नोंद

136 जणांना डिस्चार्ज, 2 मृत्यू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 171 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 136 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 94 हजार 948 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 91 हजार 609 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1726 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 710 अशा 2436 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 714 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1359 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात थेरगाव येथील 52 वर्षीय पुरुष आणि चिंचवड येथील 51 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *