Pimpri news: पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची पदोन्नतीने बदली

Pimpri news: पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची पदोन्नतीने बदली
Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सामान्य ) या पदावर करण्यात आली आहे. मितभाषी असलेल्या पाटील यांनी कोणत्याही वादात न पडता सर्वसमावेशक कामगिरी केली. कोरोना महामारीत आरोग्य, वैद्यकीय विभागाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

अप्पर जिल्हाधिकारी (गट-अ) संवर्गातील संतोष पाटील हे 29 सप्टेंबर 2018 रोजी पिंपरी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदी रुजू झाले. या दोन वर्षांच्या काळात त्यांनी स्थापत्य, वैद्यकीय, भांडार, उद्यान, क्षेत्रीय कार्यालय आदींचा कार्यभार सांभाळला.

राज्य सरकारने पाटील यांना अप्पर जिल्हाधिकारी निवड श्रेणी (गट-अ) या संवर्गात बढती दिली आहे. तसेच त्यांची बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *