Pimpri news: आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यातील वादावर पडदा

 

Pimpri news: आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यातील वादावर पडदा
Pckhabar- भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील सत्तासंघर्षावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पडदा पडला आहे.  

वाकडच्या विकासकामांवरून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत   आमदार जगताप समर्थक सदस्यांनी गोंधळ घातला होता. ‘त्या’ विषयावरून भाजपाच्या दोन आमदारांमधील सत्ता संघर्ष चव्हाट्यावर आला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यातील वाद मिटवला असल्याची माहिती मिळत आहे. फडणवीस यांनी हा समेट घडवून आणला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाचे सध्या तीन गट सक्रिय असून त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही. स्वतःला निष्ठावंत समजणार्‍या भाजप पदाधिकार्‍यांचा गट सध्या कोणत्याच भूमिकेत नाही. त्यामुळे जगताप आणि लांडगे गटात वारंवार वाद होताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *