Pimpri news: दिव्यांग महिला बचत गट निर्मिती संदर्भात महिलांना मार्गदर्शन

Pimpri news: दिव्यांग महिला बचत गट निर्मिती संदर्भात महिलांना मार्गदर्शन

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागर वस्ती विभागाचे  उपआयुक्त अजय चारठणकर, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग महिलांच्या बचत गटाची स्थापना करण्यात येत आहे. या बचत गटाच्या माध्यमातून दिव्यांग महिलांना त्यांचे आयुष्य स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मदत केली जाणार आहे.

दिव्यांग महिलांच्या बचत गटाच्या स्थापन करण्यासंदर्भात गटातील सर्वांना एकत्रित करून त्यांना माहिती देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने बचत गटांना केली जाणारी मदत तसेच विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिव्यांग महिलांना देण्यात येणार आहे.

दिव्यांग महिला बचत गट निर्मिती संदर्भात मंगळवारी निगडीतील दिव्यांग महिलांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती समूह संघटक सुप्रिया करंजकर आणि दिपज्योती यादव यांनी दिली.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *