Pimpri Corona news: शहरात 114 नवे कोरोनाग्रस्त
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी 114 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरात मंगळवारअखेर 94 हजार 639 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 91 हजार 382 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 721 तर हद्दीबाहेरील 707 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मंगळवारी 1 हजार 980 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 496 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 678 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 191 घरांना भेटी देऊन 3 हजार 882 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.










Leave a Reply