Talegaon Dabhade news: महिला सक्षमीकरणासाठी ‘मेधावीन फाउंडेशन’ ची स्थापना

 

Talegaon Dabhade news: महिला सक्षमीकरणासाठी ‘मेधावीन फाउंडेशन’ ची स्थापना

Pckhabar- महिला सबलीकरण, सक्षमीकरण, सशक्तीकरणावर भर देऊन महिला उद्योजिका तयार करण्याच्या उद्देशाने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांच्या संकल्पनेतून प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ” मेधावीन फाउंडेशन ” ची स्थापना सारिका सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली. 

या वेळी पोलीस निरीक्षक कुंदा गावडे,वडगावच्या माजी उपनगराध्यक्षा माया चव्हाण ,नगरसेविका मंगल भेगडे,हेमलता खळदे, संगीता शेळके,पूजा वाहिले,उद्योजिका स्वाती पवार,मीरा म्हस्के,सोनिया खळदे, सारिका नवले,संध्या थोरात आदि उपस्थित होत्या. तर मधुरा ढमढेरे,राजेश्री उमक ,शिवानी सोनावणे, यांनी संस्थेला शुभेच्या दिल्या.

 

 यावेळी प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक स्वरूपात 15 जेष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच केकच्या पाककृतीचे प्रशिक्षण देऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

         
स्वागत गीत ज्योति दाभाडे यांनी तर स्वागत निशा पवार, तसेच संस्थेची उद्दिष्ट वर्षा येवले यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक वैशाली दाभाडे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन ज्योति शिंदे, रुपाली झवेरी व वीणा दाभाडे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा जाधव यांनी केले. आभार स्वाती विक्रम दाभाडे यांनी  मानले. सर्व उपस्थिताना   सॅनिटायझर व N 95 मास्क देण्यात आले.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *