Sangvi news: राजीव गांधी प्रतिष्ठानतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pckhabar-काँग्रेसच्या नेत्या व युपीए  अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथील राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 या रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवा उद्योजिका दुर्गा भोर यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजक स्व. राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश नवले, पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे खजिनदार राजेंद्रसिंग वालिया, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहित शेळके, सिमरन चावला, जागृती मनाकांत, मोरया ब्लड बँकेचे मार्केटिंग व्यवस्थापक मकरंद शहापूरकर आदी उपस्थित होते.        

यावेळी बोलताना संदेश नवले म्हणाले, की आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत राजीव गांधी प्रतिष्ठान तर्फे मोरया ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दीडशे रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *