Pimpri corona News: शहरात आज 138 नवीन रुग्णांची नोंद, 90 जणांना डिस्चार्ज, 5 मृत्यू

Pimpri corona News: शहरात आज 138 नवीन रुग्णांची नोंद, 90 जणांना डिस्चार्ज, 5 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या  विविध भागातील 137 आणि पालिका हद्दीबाहेरील 1 अशा 138 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या  90 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 93 हजार 515 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 89 हजार 747 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1668 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 685 अशा 2353 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 918 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 913 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.  

शहरातील चार तर पालिका हद्दीबाहेरील एक अशा पाच रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात भोसरीतील 57
वर्षीय पुरुष, वल्लभनगर येथील 85 वर्षीय पुरुष, मोशीतील 34 वर्षीय युवक, थेरगाव येथील 82 वर्षीय महिला, बारामतीतील 80 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *