Maval news: चांदखेड जिल्हा परिषद शाळेला वॉटर फिल्टर प्लँटचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते लोकार्पण
Pckhabar-विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे या हेतूने चांदखेड जिल्हा परिषद शाळेला वॉटर फिल्टर प्लँटचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
ॲक्वाटेक सिस्टिम्स (एशिया) प्रा.लि. यांच्या सहकार्यातून प्रोजेक्ट ॲक्वा लाईफ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदखेड मावळ येथे वॉटर फिल्टर प्लँट लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी कंपनीच्या वतीने शाळेला फिल्टर उपलब्ध करून देण्यात आला, त्याबद्दल वीरधवल शिरोळे (HR-AquaTech) यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी विजयकुमार गुरव, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, सुरेखा गाडे, प्रवीण दरेकर, दिलीप आनंदे, गणपतराव गायकवाड, चंद्रकांत कदम, बाळासाहेब गरुड, कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र रायकर, भीमाशंकर लोटे, राजकुमार खराडे, सरपंच अमोल कांबळे, मनोज येवले, विकास वाजे, विजय सातकर, युवराज केदारी, प्रकाश आगळमे, संजय गायकवाड, योगिता कदम, मनिषा रायकर, भरत गायकवाड, इतर मान्यवर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)













Leave a Reply