Pimpri Corona News: शहरात आज 172 नवीन रुग्णांची नोंद, 82 जणांना डिस्चार्ज, 6 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 167 आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा 172 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 82 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 93 हजार 255 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 89 हजार 593 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1660 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 682 अशा 2342 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 899 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1378 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील चार तर पालिका हद्दीबाहेरील दोन अशा सहा रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात पिंपळेगुरव येथील 78 वर्षीय पुरुष, चिखलीतील 43 वर्षीय पुरुष, सांगवीतील 57 वर्षीय पुरुष, सांगवीतील 80 वर्षीय वृद्ध महिला, उस्मानाबाद येथील 70 वर्षीय पुरुष, बालेवाडीतील 45 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply