Pimpri Corona News: शहरात आज 149 नवीन रुग्णांची नोंद, 280 जणांना डिस्चार्ज, 9 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 149 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 280 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 93 हजार 88 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 89 हजार 511 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1656 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 680 अशा 2336 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 854 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1028 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील सात तर पालिका हद्दीबाहेरील दोन अशा नऊ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात पिंपरीतील 72, 55 वर्षीय दोन पुरुष, भोसरीतील 56 वर्षीय पुरुष, चिखलीतील 81 वर्षीय पुरुष, निगडीतील 59 वर्षीय पुरुष, भोसरीतील 70 वर्षीय महिला, चिखलीतील 70 वर्षीय महिला, आंबेगाव येथील 54 वर्षीय पुरुष आणि आळंदीतील 40 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply