Pimpri Corona News: शहरात आज 165 नवीन रुग्णांची नोंद, 259 जणांना डिस्चार्ज, नऊ मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 165 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 259 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 92 हजार 939 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 89 हजार 231 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1649 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 678 अशा 2327 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 811 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1320 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील सात तर पालिका हद्दीबाहेरील दोन अशा नऊ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात पिंपरीतील 57, 82 वर्षीय दोन पुरुष, थेरगावातील 65 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव 65 वर्षीय पुरुष, पिंपळेसौदागर 63 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव 74 वर्षीय महिला, संत तुकारामनगर 70 वर्षीय महिला, लोहगाव येथील 53 वर्षीय महिला, जुन्नर मधील 71 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply