Pimpri Corona News: शहरात आज 240 नवीन रुग्णांची नोंद, 393 जणांना डिस्चार्ज, नऊ मृत्यू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 223 आणि पालिका हद्दीबाहेरील 17 अशा 240 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 393 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 92 हजार 774 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 88 हजार 972 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1642 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 676 अशा 2318 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 846 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 991 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील चार तर पालिका हद्दीबाहेरील पाच अशा नऊ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवड येथील 79 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 35 वर्षीय युवक, चिखलीतील 74 वर्षीय महिला, थेरगांवातील 82 वर्षीय महिला, खेड येथील 80 वर्षीय पुरुष, सोलापूर येथील 80 वर्षीय पुरुष, देहुगाव मधील 68 वर्षीय पुरुष, जुन्नर येथील 65 वर्षीय महिला, देहुरोड येथील 71 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply