Pimpri Corona news: कोरोनाचे 220 नवे रूग्ण, 222 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona news: कोरोनाचे 220 नवे रूग्ण, 222 जणांना डिस्चार्ज
 Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी कोरोनाचे 220 नवे रूग्ण आढळले आहेत. एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही.  
शहरात मंगळवारअखेर 92 हजार 551 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये  88 हजार 579 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार  638  तर हद्दीबाहेरील 671 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी 2 हजार 817 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 3 हजार 770 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 6 हजार 97 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 222 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 1 हजार 376 घरांना भेटी देऊन 4 हजार 461 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.