Lonavala news: त्रिपुरारी पौर्णिमेला लोहगड शिवस्मारकावर दीपोत्सव साजरा
Pckhabar- मागील 21 वर्षापासून लोहगड व विसापूर किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी कार्यरत असणार्या लोहगड-विसापूर विकास मंचाच्या वतीने दर वर्षी प्रमाणे यावर्षी हि त्रिपुरारी पौर्णिमेला लोहगड शिवस्मारकावर दीपोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शिवस्मारकावर रांगोळ्या व पणत्यांनी लखलखता दीपोत्सव करण्यात आला. दीपोत्सवामुळे शिवस्मारक व आजूबाजूचा परिसर पणत्यांच्या प्रकाशात उजळुन निघाला होता. कार्यक्रमावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी उपमहापौरांनी आपल्या मनोगतातुन मंचाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच लोहगड ग्रामस्थ व मंचाच्या पुढाकाराने साकारण्यात येणार्या शिवसृष्टीच्या तांत्रिक बाबींसाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी गणेश धानीवले, राजू शेळके, रमेश बैकर, शंकर चिव्हे, पोपट दिघे, बाळू बैकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.










Leave a Reply