Maharashtra news : डॉ. शीतल आमटे यांचे अखेरचं ट्विट; त्यांना नेमकं काय सांगायचं होतं?
Pckhabar: ज्येष्ठ समाजसेवक आणि महारोग्यांना आसरा देणाऱे बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या, डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येनं सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात डॉ. शीतल आमटे यांना उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक अंदाज वर्तवल्यानुसार शीतल आमटे या मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होत्या. ज्यामुळं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.
सोमवारी त्यांच्या आत्महत्येचं वृत्त समोर येण्यापूर्वी, सोमवारी सकाळी 5 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास शीतल आमटे यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी ऍक्रेलिक कॅनव्हास पेंटींगचा फोटो शेअर केला. या फोटोवर चित्राच्या खाली त्यांचं नाव आणि रविवारची म्हणजेच 29 नोव्हेंबरची तारीखही दिसत आहे.
चित्राचा फोटो पोस्ट करत त्यांनी ‘वॉर अॅण्ड पीस’ असं कॅप्शन त्यासोबत लिहिलं. युद्ध आणि शांतता असाच त्यांच्या या कॅप्शनचा शब्दश: अर्थ होतो. याच कॅप्शनमुळं अनेकांच्यात मनात कैक प्रश्न निर्माण होत आहेत. शीतल आमटे या माध्यमातून काही सांगू किंवा बोलू इच्छित होत्या का, यामागचं मुख्य कारण काय असेच प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या ट्विटनंतर काही वेळानं पुढे जेव्हा त्यांच्या आत्महत्येची बातमी समोर आली.










Leave a Reply