Pimpri corona News: शहरात आज 172 नवीन रुग्णांची नोंद, 178 जणांना डिस्चार्ज, दोन मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 172 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 178 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 92 हजार 331 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 88 हजार 357 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1629 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 669 अशा 2298 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1029 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1870 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील एक तर पालिका हद्दीबाहेरील एका अशा दोन रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. त्यात दापोडीतील 61 वर्षीय महिला आणि हिंजवडीतील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply