Traffic news : सोमाटणे टोल नाक्यावर वाहतूक कोंडी; वाहन चालकांचा उद्रेक, विना टोल वाहने सोडली

 

Traffic news : सोमाटणे टोल नाक्यावर वाहतूक कोंडी; वाहन चालकांचा उद्रेक, विना टोल वाहने सोडली
Pckhabar- टोलच्या नावाखाली पैसे देऊन देखील जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र.4 सोमाटणे फाटा येथील टोल नाक्यावरून प्रवास कारणार्‍या प्रवाश्यांना प्रमाणापेक्षा जास्त वेळ इंधन जाळून व वेळ खर्च करून वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहन चालकांचा उद्रेक झाल्याने चालकांनी असहकार करत विना टोल वाहने सोडून वाहतूक कोंडी फोडली.

चौथा शनिवार, रविवार आणि सोमवारी गुरूनानक जयंती अशा जोडून तीन सुट्या आल्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती.  जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे टोल नाक्याजवळ होणार्‍या रोजच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी त्रस्त झाले आहे. त्याचा उद्रेक होऊन नागरिकांनी असहकार करत वाहतूक कोंडी फोडली. टोलच्या नावाखाली पैसे घेऊनही नागरिकांना योग्य सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.

टोल नाक्यावरील दुर्तफा सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत गाड्यांच्या लांबच रांगा लागलेल्या असतात. जिथे वाहनांना तीन मिनिटांचा वेळ लागणे आवश्यक आहे. तिथे तासाभराचा वेळ वाया गेल्याने ताटकळत बसावे लागत आहे. रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून सामाजिक कार्यकर्ते आणि त्रस्त नागरिकांनी संताप व्यक्त केला.

टोलच्या नावाखाली पैसे घेऊन नागरिकांना योग्य सुविधा मिळत नसल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त करत सर्व वाहने विना टोल सोडण्यात अली.  3 मिनिटांच्या वर वाहने थांबली तर टोल माफ असल्याच्या सूचनांचा विचार प्रशासनाने करावा. यापुढेही हे शांततापूर्ण असहकार चालूच राहील. असे वाहन चालकांनी सांगितले आहे. रुग्णवाहिका आणि अग्नीशमन दलासाठी एक मार्गिका मोकळी असावी अशी मागणी चालकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *