Chinchwad news: पुर्णानगरमध्ये अनोख्या पध्दतीने तुलसी विवाह!
Pckhabar- त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पूर्णानगर येथील नक्षत्र सोसायटी फेज,2 मध्ये अजय पाताडे यांच्या घरापुढे अनोख्या पध्दतीने तुलसी विवाह हा कार्यक्रम आयोजित केला होता. या विवाह सोहळ्यात शासनाच्या सूचनांचे पालन करू आणि कोरोनावर मात करू, असा संदेश पताका व मास्करुपी अंतरपाठद्वारे देण्यात आला.
तुळशी विवाहानंतर पुढील वर्षभर लग्नकार्य होत असतात या पुढील कार्यक्रमांमध्ये प्रत्येक नागरिकानी मास्कचा वापर करून स्वतःची, कुटुंबाची व देशाची काळजी घ्यावी.
तसेच शासनाच्या सूचनांचे पालन करू आणि कोरोनावर मात करू, असा संदेश पताका व मास्करुपी अंतरपाठद्वारे देण्यात आला. यापुढे असाच सर्वांनी आनंदी जीवन प्रवास चालू ठेवावा. त्यासाठी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन अक्षता अजय पाताडे, मनीषा राजेश नांगरे, रुपाली लक्ष्मीकांत चौधरी, सुवर्णा उत्तम पवार, अमृता दिनेश मिश्रा यांनी केला.










Leave a Reply