Pimpri Corona news : कोरोनाचे 200 नवे रूग्ण, 142 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी कोरोनाचे 200 नवे रूग्ण आढळले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरात रविवारअखेर 92 हजार 159 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 88 हजार 179 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 628 तर हद्दीबाहेरील 668 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी 2 हजार 561 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले.
2 हजार 227 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 757 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 142 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 1 हजार 177 घरांना भेटी देऊन 3 हजार 920 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.










Leave a Reply