pandharpur news :  आमदार भारत भालके यांच्या आठवणी सांगताना अजित पवारांना अश्रू अनावर!

pandharpur news :  आमदार भारत भालके यांच्या आठवणी सांगताना अजित पवारांना अश्रू अनावर!
Pckhabar-आमदार भारत नाना भालके लोकनेते आणि जनतेशी नाळ जोडलेला नेता होता. नाना मनाने हळवे होते. हक्काने काम करून घ्यायचे. नानांनी कोरोनाचा धोबीपछाड दिली होती. मात्र अन्य आजारामुळे नाना गेले. महाविकास आघाडीला आजच एक वर्ष पूर्ण झाले आहे. सरकारला भक्कम पाठिंबा देणारा आमदार हरपला. नानांच्या सभागृहातील आठवणी सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अश्रू अनावर झाले होते.

कोरोनामुळे जिवाभावाची माणसं सोडून गेली आहेत.सर्वांनी स्वतःची आणि परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे.नानांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे सांगत भारत नानांच्या सभागृहातील आठवणी सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अश्रू अनावर झाले होते. भालके परिवाराच्या पाठीशी भक्कम उभे राहू असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *