Pimpri Corona News: आज 217 नवीन रुग्णांची भर, 177 जणांना डिस्चार्ज, 7 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 217 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 177 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 91 हजार 967 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 88 हजार 37 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1624 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 668 अशा 2292 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 965 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1615 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील सहा तर पालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. त्यात काळेवाडीतील 66 वर्षीय पुरुष, रावेत मधील 42 वर्षीय पुरुष, च-होलीतील 55 वर्षीय पुरुष, दिघीतील 66 वर्षीय पुरुष, दापोडीतील 70 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 75 वर्षीय वृद्ध महिला आणि खेड येथील 49 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply