Maharashtra news: पुणेकरांनी बनविलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये-  सुप्रिया सुळे

 

Maharashtra news: पुणेकरांनी बनविलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये-  सुप्रिया सुळे

Pckhabar- पुणेकरांनी बनविलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

पुणे पदवीधर मतदार संघ तसेच शिक्षक मतदार संघ या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील वैशाली मंगल कार्यालयात आयोजित प्रचार सभेत सुळे बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार संग्राम जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार सुनिल शेळके, माजी मंत्री मदन बाफना, पूजा बुट्टे, बापूसाहेब भेगडे, बबनराव भेगडे, राजेश खांडभोर, गणेश खांडगे, गणेश काकडे, अर्चना घारे, सचिन घोटकुले, विलास मालपोटे, मयूर ढोरे, सुनील दाभाडे, यादवेंद्र खळदे, वैशाली दाभाडे, सुभाष जाधव, राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

सुळे पुढे म्हणाल्या, आज आहेत ’ते’ आपल्या पुण्यात आले आहेत.  बघा ’दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं. जग फिरल्यावर शेवटी आमच्या पुण्यातच लस सापडणार आहे. ही लस पुणेकरांनी शोधलीये, नाही तर कोणीतरी म्हणायचे मीच  शोधली. पुण्यामध्येच ही लस तयार झालेली आहे, पुणेकरांनी ती लस शोधलेली आहे, त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी क्लेम केलं, तर गैरसमज नसावेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *