Maval news : मावळ तालुक्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल जोमाने सुरु : खासदार सुप्रिया सुळे

 

Maval news : मावळ तालुक्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल जोमाने सुरु : खासदार सुप्रिया सुळे
Pckhabar- अवघ्या वर्षभरात मावळ तालुक्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल जोमाने सुरु आहे. पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे, अशा सुचना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या. तसेच मावळातील सर्वसमावेशक विकास कामांबाबत त्यांनी कौतुक केले.

पुणे विभागातील महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ तळेगाव दाभाडे येथे संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे व पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचा ‘कार्यकर्ता मेळावा’ संपन्न झाला. त्यावेळी खासदार सुळे बोलत होत्या.

जेष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल व पंढरपूरचे आमदार भारतनाना भालके यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पदवीधरांच्या हक्कासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ही निवडणूक आहे. या निवडणुकीतील मतदार आपले आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचुन संवाद साधुन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान करून घ्यावे, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले.

यावेळी महाविकास आघाडीचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी, मान्यवर, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *