Nigdi crime news: इंडियन आर्मीमधून बोलत असल्याचे सांगून व्यावसायिकाला गंडविले
Pckhabar- मी इंडियन आर्मीमधून बोलत आहे, मला तिनशे वेपरायझरची गरज असल्याचे सांगितले. वेपरायझरचे पेमेंट करण्यासाठी क्यु आर कोड स्कॅन करण्यास भाग पाडून आरोपीने व्यावसायिकाच्या खात्यातून 1 लाख 4 हजार 988 रूपये परस्पर काढून फसवणूक केली. हा प्रकार आकुर्डी येथे नुकताच उघडकीस आला.
मनजितसिंग़ 9709343637 आणि शर्मा 9707344050 या दोन मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमेय राजेंद्र चंदने (वय-25, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमेय यांचे आकुर्डीत नरेंद्र एन्टरप्रायजेस नावाने दुकान आहे. त्यांना आरोपी मनजितसिंगने फिर्यादी यांना फोन करून मी इंडियन आर्मीमधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच मला तिनशे वेपरायझरची गरज असल्याचे सांगितले. आरोपी शर्माने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी वेपरायझर पाठवून देण्यासाठी संपूर्ण पैसे द्यावे लागतील, असे आरोपीला सांगितले. फिर्यादी यांच्या मोबाईलवर 7 क्यु आर कोड पाठवून त्यावर स्कॅन करण्यास भाग पाडले. स्कॅन केल्यानंतर काही वेळातच फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 1 लाख 4 हजार 988 रूपये काढून घेत फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप भोसले तपास करत आहेत.
Nigdi crime news: इंडियन आर्मीमधून बोलत असल्याचे सांगून व्यावसायिकाला गंडविले










Leave a Reply