Talegaon Dabhade : तळेगाव-चाकण महामार्गासाठी 300 कोटी निधी मंजूर; आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
Pckhabar- तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने एकूण 24 किलोमीटर रस्ता दुरुस्ती व मजबुतीकरण अंतर्गत काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. वाढती वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता कुठलेही संपादन न करता तळेगाव ते चाकण असे 24 किलोमीटर अंतर 12 मीटर रुंद काँक्रिटीकरण करण्यासाठी तीनशे कोटी रुपये खर्चाची मंजुरी मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही मंजुरी दिली आहे. तळेगाव-चाकण या परिसरात औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तथापि, नागरीकरणही दिवसेंदिवस वाढत आहे. हा रस्ता औद्योगिक वसाहतीचा मुख्य रस्ता असून वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे वाहनचालक, कामगार, स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या वाहतूक कोंडीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत आमदार सुनिल शेळके म्हणाले, तळेगाव-चाकण रस्ता काँक्रिटीकरण झाल्यास वाहतूक कोंडी समस्या कमी होईल. तसेच विकासाला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे. या कामासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकार्य केल्याबद्दल आमदार शेळके यांनी आभार मानले.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply