Maval news : महाविकास आघाडीचे उमेदवार समाजासाठी तळमळीने काम करणारे : आमदार सुनिल शेळके
Pckhabar- पदवीधर निवडणूकीतील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार प्रामाणिक, शांत व समाजासाठी तळमळीने काम करणारे आहेत. पदवीधरांच्या समस्या लक्ष घालून सोडवु शकतात. त्यामुळे आपल्या पहिल्या पसंतीचे बहुमुल्य मत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला द्यावे असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले.
वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनल असोसिएशन यांच्यासोबत पुणे पदवीधर मतदारसंघ महाविकासआघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण गणपती लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न झाली. त्यावेळी आमदार शेळके बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, ॲड.नामदेव दाभाडे, ॲड.कौशल, असोसिएशन अध्यक्ष ॲड.विठ्ठल पिंपळे, उपाध्यक्ष ॲड.धनंजय कौदरे, ॲड.सोमनाथ पवळे, ॲड.मुनाफ शेख, ॲड.सुधीर भोंगाडे, ॲड.दिपक चौधरी, ॲड.स्वामी फुगे, ॲड.तन्वीर जहागीरदार, ॲड.रेश्मा घोजगे, ॲड.राम शहाणे, ॲड.नेहा बुटाला व इतर मान्यवर उपस्थित होते.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)












Leave a Reply