Pimpri news: महापालिका सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचा सत्कार

 

Pimpri news: महापालिका सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचा सत्कार
Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या  तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या एकूण 47 अधिकारी व कर्मचार्‍यांचा अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कै. मधुकर पवळे सभागृह, मनपा मुख्य इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, किरण कापसे,सुप्रिया सुरगुडे, तुकाराम गायकवाड, अविनाश तिकोने, गणेश भोसले आदी उपस्थित होते.
महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये कार्यालयीन अधिक्षक सुरेश कोंढरे, नंदकिशोर वाघ, विजय गायकवाड, मुख्याध्यापक दीपक आब्दुले, सुरेखा भोसले, असिस्टंट मेट्रन कमल डांगे, सिस्टर इन्चार्ज मिरा कदम, प्रेमलता जगताप, लेखापाल शंकर भालेराव, उपलेखापाल गिरीश इंदापूरकर, अशोक कदम, नीता वर्पे, स्टाफ नर्स शैलजा जानराव, मिटर निरिक्षक दत्तात्रय चिल्लाळ, नर्स मिड वाईफ स्मिता सोमण, ए.एन.एम. राजश्री बैरागी, उपशिक्षक साधना लोखंडे, विजया पाटील, दत्तात्रय केंगळे, हेमलता वसेकर, सुजाता गुरव, मुकादम रविंद्र जगताप, सुतार उत्तम शेवाळे, प्लंबर अंकुश तांबे, सफाई कामगार अलका बनसोडे, मोहरा मुरगुंड, सत्वशील चव्हाण, रामचंद्र शेळके, कविता ढोरे, सुवर्णा साळवी, रत्नमाला मोरे, लता लोंढे, वैशाली वडागळे, सुमन बनसोडे, बाबा फारुक, पुष्पा कदम, ताराबाई लोंढे, आया बेबी ननवरे, मजूर चंद्रकांत भोईर, रामचंद्र तवर, रखवालदार भगवान शिवरकर, सफाईसेवक शांताराम वाल्मिकी, विमला वाल्मिकी,  नामदेव साबळे, सुनील सोनावणे, मोहन जाधव आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *