Pimpri news : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
Pckhabar-अनधिकृतपणे बांधकाम केल्यामुळे पालिकेने याबाबत नोटीस देऊनही बांधकाम काढले नसल्याने महापालिकेकडून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैझर ताहीरभाई टीनवाला, भास्कर भागवत तुकाराम (दोघेही रा. मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उप अभियंता हेमंत प्रभाकर देसाई यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीनवाला आणि भास्कर यांनी मोशी गोडाऊन जवळ अनाधिकृत बांधकाम केले. याबाबत महापालिकेकडून दोघांनाही नोटीस देखील बजावण्यात आली होती. नोटीस मिळाल्यानंतर देखील त्यांनी अनधिकृत बांधकाम काढले नाही. भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
Pimpri news : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा










Leave a Reply