Pimpri Corona News: आज 239 नवीन रुग्णांची नोंद, 85 जणांना डिस्चार्ज तर 16 मृत्यू

Pimpri Corona News: आज 239 नवीन रुग्णांची नोंद, 85 जणांना डिस्चार्ज तर 16 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 231 आणि पालिका हद्दीबाहेरील 8 अशा 239 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 85 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, दिवाळीनंतर आज पहिल्यांदाच एकाचदिवशी 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 91 हजार 515 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 87 हजार 634 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1614 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 667 अशा 2281 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 876 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1441 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील 13 आणि पालिका हद्दीबाहेरील तीन अशा 16 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चिंचवड येथील 80, 84 वर्षीय दोन पुरुष, काळेवाडीतील 74 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 53 वर्षीय पुरुष, जुनी सांगवीतील 58 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील 72 वर्षीय पुरुष, तळवडेतील 62 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 75, 65 वर्षीय दोन महिला, चिंचवड येथील 75 वर्षीय महिला, दापोडीतील 70 वर्षीय महिला आणि चाकण येथील 48 वर्षीय पुरुष, देहुरोड येथील 54 वर्षीय पुरुष, तळेगाव दाभाडे येथील 70 वर्षीय वृद्ध महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *