Lonavala Crime news : दस्त नोंदणीसाठी लाच घेणार्या सह दुय्यम निबंधकाला रंगेहाथ पकडले
Pckhabar- जमिन खरेदीचे दस्त नोंदणीसाठी 25 हजारांची लाच स्विकारताना सह दुय्यम निबंधकासह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी रात्री लोणावळा येथे करण्यात आली.
लोणावळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील सह दुय्यम निबंधक रविंद्र जनार्दन भोसले (वय-60), खासगी इसम रमेश ज्ञानेश्वर आंद्रे (रा. नाणे, ता. मावळ) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने जमिन खरेदी केली होती. त्या जमिनीचे लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करायची होती. दस्त नोंदणी करण्यासाठी आरोपी सह दुय्यम निबंधक रविंद्र भोसले यांनी खासगी इसम रमेश आंद्रे याच्या मार्फत तक्ररादाराकडे 30 हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 25 हजार रूपये देण्याचे ठरले. आंद्रे याच्या मार्फत 25 हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply