Talegaon Dabhade News : ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती’!
Pckhabar- देहूगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित महिलेच्या आईचे निधन झाले. आईचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी आणि अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्यासाठी तीव्र इच्छा होती. अंत्यविधीला जाण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी खूप प्रयत्न करूनही ती उपलब्ध होत नव्हती. मावळचे आमदार सुनिल शेळके यांचे कार्यकर्ते रुपेश सोनुने यांना फोन केला तर अवघ्या १५ मिनिटांतच आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या माध्यमातून समाजाला अर्पित केलेली रुग्णवाहिका समोर उभी होती.
खरचं आपले माथा नम्रतेने झुकावा, आपले हात आपसूक जोडले जावेत, अशी खूप कमी व्यक्तिमत्व या जीवनाच्या प्रवाहात भेटत असतात. आज त्याचीच अनुभूती जनसेवक आमदार सुनिल अण्णा शेळके त्यांचे सहकारी रुपेश सोनुने व मयूर झोडगे यांच्या रूपाने मिळाली, अशी भावना संबंधित महिलेने व्यक्त केली.
देहूगाव कोविड केअर सेटरमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्ण महिलेच्या आईचे बुधवारी निधन झाले. आईचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी आणि अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्यासाठी तीव्र इच्छा होती. अंत्यविधीला जाण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी खूप प्रयत्न करूनही ती उपलब्ध होत नव्हती. मावळचे आमदार सुनिल शेळके यांचे कार्यकर्ते रुपेश सोनुने यांना फोन केला तर अवघ्या १५ मिनिटांतच आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या माध्यमातून समाजाला अर्पित केलेली रुग्णवाहिका समोर उभी होती.
त्या रुग्ण महिलेला रुग्णवाहिकेतून घेऊन आळंदीत सोडविले. त्यांनी आईचे लांबूनच दर्शन घेतले. त्यानंतर पुन्हा रुपेश भाऊ आणि मयूर भाऊ माघारी परतले.
विशेष म्हणजे कोणतीही चिडचिड न करता, काळजीने त्यांना समजावून सांगत, एकही रुपया न घेता मोफत सेवा दिली. खरंच आमदार साहेबांना का जनसेवक म्हणतात याचे उत्तर आज मिळालं. अण्णा अशा हजारो लोकांचे पुण्य तुमच्या गाठीशी आहे.
खरच अशी व्यक्तिमत्वे दुर्मिळच. म्हणूनच तर म्हणतात ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती’! , अशी भावना संबंधित महिलेने व्यक्त केली.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)












Leave a Reply