Maval news : पदवीधर निवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक

 

Maval news : पदवीधर निवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक
Pckhabar-पुणे विभागाच्या पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड व शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ वडगाव मावळ येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली.

 या बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले. काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व.अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री मदन बाफना, युवा नेते पार्थ पवार, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, आमदार सुनिल शेळके, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजुभाऊ खांडभोर तसेच महाविकासआघाडी चे सर्व आजी-माजी, जेष्ठ पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

यावेळी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आपल्या सर्वांना पुढील दिवसांत मावळ तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदारांपर्यंत वैयक्तिक पातळीवर संपर्क करायचा आहे. महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. आपल्या उमेदवारांना शिक्षक, पदवीधरांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे येणार्‍या काळात विधानपरिषदेत ते आपल्याला न्याय मिळवून देतील.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)
  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *