Dehu news : देहूगावात 6 डिसेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन

Dehu news : देहूगावात 6 डिसेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन
Pckhabar-कर्तव्य फाऊंडेशन, देहू सिग्नस फॅसिलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 6 डिसेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात चाकण MIDC मधील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

देहूगावातील संतकृपा लॉन्स, परंडवाल चौक, देहू-माळवाडी रोड येथे हा मेळावा ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. यामध्ये ८ वी ते पदवीधर, I.T.I. (सर्व ट्रेड)  डिप्लोमा-डिग्रीधारक १८ ते ४० वर्षे वयोगटातील तरूण-तरूणींना नोकरीची संधी मिळणार आहे. मेळाव्यास येताना बायोडाटा व शैक्षणिक पात्रता कागदपत्रांची झेरॉक्स, आधार कार्ड, पॅनकार्ड इ.ची झेरॉक्स व ४ फोटो घेऊन येणे आवश्यक आहे.

रोजगार मेळाव्यासाठी गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे. तसेच या मेळाव्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.

संपर्कः कर्तव्य फाऊंडेशन,देहू, ता.हवेली, जि.पुणे. 7038349858, 7040239257,9850754865, 9975234614

कर्तव्य फाऊंडेशन देहू आयोजित रोजगार मेळाव्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन गुगल फॉर्म भरावा.
https://forms.gle/6prkHKnMErTdvLCy8

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *