Article : कौशल्य विकास…एक व्रत देशसेवेचे !

Article : कौशल्य विकास…एक व्रत देशसेवेचे !

एम जे एफ लायन अशोक येवले

Pckhabar- पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी भविष्यातील युवा भारताचा विचार लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावर कौशल्य विकासासाठी प्रथम प्राधान्य दिले आहे .
भारतातून कुशल, अर्धकुशल व अकुशल  कामगार, संपूर्ण जगात रोजगारानिमित्त देशाटन करताना आढळून येतात. भविष्यातील चित्र  मात्र पालटलेले दिसेल. इतर देश कुशल कामगारांसाठीच आपल्या देशाचे दरवाजे उघडे ठेवतील आणि म्हणूनच कौशल्य विकास हे एका अर्थाने देशकार्यच ठरणार आहे. चला तर, लायन्स क्लबच्या माध्यमातून या देशकार्यास हातभार लावू या.

कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतांना सहा ” क ” ची मात्रा उपयोगात आणता येईल. का करायचे?काय  करायचे ?कोणासाठी करायचे  ? केंव्हा करायचे ? कोठे आणि कसे करायचे या सहा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला कौशल्य विकास कामाची दिशा दाखवतीलच व त्याचबरोबर यशाची गुरुकिल्ली हातात देतील .

विविध शाळा व कॉलेजेस मधून दिल्या  जाणाऱ्या  शिक्षणामध्ये व्यवसायाभिमुख  शिक्षणाचा अभाव हे युवकांमधील बेरोजगारीच्या कारणांपैकी  एक महत्वाचे कारण आहे. रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यासाठी कारागीर, सुतार, प्लंबर, नर्स, पॅरामेडिकोज व शेतकरी देऊ शकण्याची शक्यता निर्माण करणे आवश्यक आहे . तसेच आर्टिफिसिअल इंटेलिजन्स, बिग डेटा analysis, रोबोटिक, 3डी प्रिंटिंग याही क्षेत्रांचा विचार करावा लागेल. हे साध्य करण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयांमधून व्यवसायाभिमुख शिक्षणाचा समावेश करण्यासाठी आपण पुढाकार घेणे आवश्यक आहे.

कौशल्य विकासासाठी अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. औद्योगिक   कृषि, पर्यटन अशी पार्श्वभूमी असलेल्या क्षेत्रात गरजेनुसार विषय रचना महत्वाची ठरेल.
त्याचप्रमाणे शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांवर थोडी जास्त मेहनत घेतली तर ती भविष्यकाळासाठी मोठी गुंतवणूक असेल . अशावेळी साधारण मुलांबरोबरच अंध, अपंग व बधिर मूक विद्यार्थ्यांना विसरून चालणार नाही. त्यांचाही प्राधान्याने विचार करावाच लागेल.

विविध क्षेत्रातील गुणवंत तज्ञ उपलब्ध आहेत. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात ही गुणवत्ता वापरून आपण कौशल्य विकास यशस्वी करू शकतो. उदाहरणार्थ मुलांना मोजमाप पद्धती ज्यात फूटपट्टी, मीटर टेप, व्हर्निअर  कॅलिपर, मायक्रोमीटर  इत्यादी, घरगुती  व औद्योगिक वायरिंग, लेड ऍसिड  बॅटरी देखभाल, मोटार सायकल रिपेरिंग, ऑटोमोबाईलची माहिती, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन, आदिवासी महिलांना स्वयंरोजगाराची संधी अशा अनेक विषयांचा समावेश करता येईल .

सरकार पुरस्कृत कौशल्य विकास कॉम्पुटर इन्स्टिटयूट , वैज्ञानिक विचार मुलांमध्ये रुजविणारी विज्ञान वाहिनी, लेंड अ हँड  अशा संस्था पंतप्रधान कौशल्य विकासात सक्रिय आहेत. त्यांच्या मदतीने कौशल्य विकास उपक्रम घेऊन शालेय शिक्षण व व्यवसायाभिमुख शिक्षण यांची योग्य सांगड घालता येईल .

लायन बंधू आणि भगिनींनोभगिनींनो, आपल्या राष्ट्राचा व आपल्या भावी पिढीचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी कौशल्य विकास या राष्ट्र कार्यास हातभार लावू या व लायन्सची प्रतिमा जगभरात उंचावू या.

जय भारत, जय लायनिझम ,
आपल्या मदतीस सदैव तत्पर !

एम जे एफ लायन अशोक येवले व लायन उषा येवले

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *