Pimpri news: स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी कायम उद्यमशील रहायला हवे-पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

Pimpri news: स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी कायम उद्यमशील रहायला हवे-पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश
 Pckhabar-देशाला स्वर्णयुगाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी उद्योजक निर्माण होेणे गरजेचे आहे. तसेच स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी कायम उद्यमशील रहायला हवे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी  केले.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व पुणे जिल्हा विकास केंद्र यांच्या सहकार्याने पोलिस पाल्यांसाठी आयोजित उद्योजकता परिचय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कृष्णप्रकाश बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाली. याप्रसंगी औरंगाबाद एमसीईडीचे कार्यकारी संचालक सुरेश लोंढे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंधाळकर, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे, सिटिझन फोरमचे मुख्य समन्वयक तुषार शिंदे, महाराष्ट्र उद्योजकता केंद्राचे प्रशिक्षक, पोलिस कर्मचारी व त्यांचे पाल्य उपस्थित होते.
औरंगाबाद एमसीईडीचे कार्यकारी संचालक सुरेश लोंढे  उद्योग क्षेत्राला आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे.  ‘एमएसएमई’ क्षेत्र हे कोणत्याही देशाची मोठी ताकद असते. युवा वर्गाकडे मोठी ऊर्जा आहे त्यांनी ती ऊर्जा मार्केटमध्ये वेगवेगळ्या संधी शोधण्यासाठी वापरली पाहिजे असेही ते म्हणाले. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिसांच्या पाल्यांना उद्योग विषयक प्रशिक्षण, बँकेकडून मिळणारं आर्थिक सहाय्य, शासनाच्या वेगवेगळ्या योजना आणि संबंधित विषयांचे तज्ञ यांच्याकडून मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांना उद्योजक बनवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक तो सर्व पाठिंबा आणि मार्गदर्शन आम्ही देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्रास्ताविक सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे आणि रत्ना दहिवलकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *