Pimpri Corona News: मृत्यूचा आकडा वाढला, आज दहा मृत्यू, 189 नवीन रुग्ण

Pimpri Corona News: मृत्यूचा आकडा वाढला, आज दहा मृत्यू, 189 नवीन रुग्ण

Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 183 आणि पालिका हद्दीबाहेरील 6 अशा 189 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. तर, दहा जणांचा मृत्यू झाला आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 91 हजार 38 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 87 हजार 461 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1596 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 661 अशा 2257 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 781 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 946 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील पाच आणि पालिका हद्दीबाहेरील पाच रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये आकुर्डीतील 57 वर्षीय पुरुष, थेरगांवातील 84 वर्षीय पुरुष, भोसरीतील 52 वर्षीय पुरुष, चिंचवडमधील 73 वर्षीय महिला, थेरगावातील 65 वर्षीय महिला आणि खेड येथील 74 वर्षीय पुरुष, सोलापूर येथील 80 वर्षीय पुरुष, नारायणगांव मधील 59 वर्षीय पुरुष, पारनेर येथील 85 वर्षीय पुरुष, जुन्नर येथील 50 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.