Pimpri Smart Citi News: दीडशे कोटींचा घोटाळा, चौकशी करा – सुलभा उबाळे

Pimpri Smart Citi News: दीडशे कोटींचा घोटाळा, चौकशी करा – सुलभा उबाळे
Pckhabar- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील कामात दीडशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना शिरुर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली आहे.

याबाबत शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे. त्यात उबाळे यांनी म्हटले आहे की, स्मार्ट सिटीअंतर्गत 2018-19 मध्ये काढलेल्या विविध विकास कामांच्या निविदा ठराविक कंपन्या डोळ्यासमोर ठेवून काढल्या आहेत. त्यांच्या सोईप्रमाणे सल्लागाराच्या मदतीने अटी-शर्ती बनवण्यात आल्या. कामाची कालमर्यादा संपल्यानंतरही कामे 50 टक्के देखील पूर्ण झालेली नाहीत. त्याप्रमाणे त्यांना विलंब आकार लावण्यात आलेला नाही. करारमान्याप्रमाणे काम सुरु असल्याचे दिसत नाही.

कामातील अनेक वस्तुंच्या मूळ उत्पादकांमध्ये बदल करण्यात आला आहे. हे निविदा नियमांच्या विरोधात आहे. अनेक वस्तूंचे दर बाजारभाव न तपासता कुठल्याही सक्षम तांत्रिक बाबींचा सल्ला न घेता ठरविले. या सगळ्याचे ऑडीट होणे आवश्यक आहे. कंपन्यांनी पुरवलेले मनुष्यबळ अकुशल असून कामांबाबत दिलेले प्रशिक्षण, त्यामधील प्रशिक्षाणार्थी यामध्ये घोळ आहे. याबाबी भ्रष्टाचाराचे संकेत देतात.

यात सहभागी झालेल्या कंपन्यांपैकी एल अॅन्ड टी व टेक महिंद्रा या नामांकित कंपन्या आहेत. त्यांनी देखील स्थानिक पदाधिका-यांच्या दबावाला बळी पडून अनेक कामे अकुशल, अनुभव नसलेल्या लोकांना दिली आहेत. त्याचा थेट परिणाम कामाचा दर्जावर होत आहे. टेक महिंद्रा कंपनीने जॉईंट व्हेंचरमध्ये क्रिस्टल इंटिग्रेटेड आणि आर्कस या कंपन्यांना कामे दिली आहेत.

यापैकी क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीच्या संचालकपदी विधानपरिषदेच्या भाजप आमदारांची पत्नी, मुलगा, मुलगी आहेत. त्यांच्या व्यावसायाबाबत आमची हारकत नाही. पण, पिंपरी पालिकेत भाजपची सत्ता आहे. ही कामे राज्यात भाजपचे सरकार असताना 2018-19 मध्ये दिली गेली आहेत. सत्तेचा दुरुपयोग करुन या कामांध्ये दीडशे कोटींचा घोटाळा झाला आहे. त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व चौकशी करण्याची मागणी उबाळे यांनी निवेदनातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *