Pimpri corona News: शहरात आज 159 नवीन रुग्णांची नोंद, 109 जणांना डिस्चार्ज, सहा मृत्यू

Pimpri corona News: शहरात आज 159 नवीन रुग्णांची नोंद, 109 जणांना डिस्चार्ज, सहा मृत्यू

Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या  विविध भागातील 159 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 90 हजार 855 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 87 हजार 384 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1591 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 657 अशा  2248 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 736 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 747 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. 

शहरातील पाच आणि पालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मोशीतील 46 वर्षीय पुरुष, रूपीनगर येथील 88 वर्षीय पुरुष, भोसरीतील 80
वर्षीय पुरुष, सांगवीतील 72 वर्षीय पुरुष, वाकड मधील 65 वर्षीय महिला आणि पालिका हद्दीबाहेरील मंचर येथील 32 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *