Dehu news : संत तुकाराम विद्यालय व कै. शंकरराव मोरे ज्युनियर कॉलेजला दहा लिटर सॅनिटायझर, 2 थर्मलगन, 2 सॅनिटायझर स्टॅन्ड भेट
Pckhabar- कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) पासून ग्रामीण भागातील विद्यालय आणि काॅलेज सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये, म्हणून काळजी घेतली जात आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत
तीर्थक्षेत्र देहूगावातील संत तुकाराम विद्यालय व कै. शंकरराव मोरे ज्युनियर कॉलेजला साई श्रद्धा मेडिकलचे प्रो.प्रा. रामदास साठे, श्री कृपा मेडिकलचे प्रो.प्रा.धनंजय गारगोटे, सिद्धी मेडिकलचे प्रो.प्रा.दौलत कुऱ्हाडे व अजिंक्य हेल्थ मार्टचे प्रदीप भसे यांच्या विशेष सहकार्याने दहा लिटर सॅनिटायझर, 2 थर्मलगन, 2 सॅनिटायझर स्टॅन्ड भेट देण्यात आले.
आजपासून इयत्ता नववी, दहावी व ज्युनिअर कॉलेज सुरू झाले आहे. हे लक्षात घेऊन अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक वृंद व अभंग प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.


बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply