Pimpri Corona news : शहरातील कोरोना रूग्ण संख्या पुन्हा दोनशे पार

 

Pimpri Corona news : शहरातील कोरोना रूग्ण संख्या पुन्हा दोनशे पार
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात दिवाळीनंतर पुन्हा कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. दररोज दिडशेच्या आसपास वाढणारी रूग्ण संख्या पुन्हा दोनशे पार होऊ लागली आहे. त्यामुळे शहरवासीयांना चिंतेत टाकणारी ही बाब आहे. रविवारी कोरोनाचे 230 नवे रूग्ण आढळले आहेत. एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.

शहरात रविवारअखेर 90 हजार 696 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये  87 हजार 275 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार  586  तर हद्दीबाहेरील 656 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी 3 हजार 501   संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 940  जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 453 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 104 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 1 हजार 444 घरांना भेटी देऊन 4 हजार 827 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *