Dehu news : अभंग प्रतिष्ठानतर्फे ऊसतोड बांधवांच्या मुलांना स्वेटरचे वाटप
Pckhabar- थंडीचे दिवस सुरू झाल्याने ऊसतोड कुटुंबातील लहान मुलांना अभंग प्रतिष्ठानचे सदस्य सचिन लिंभोरे व वसंत परशुराम भसे यांच्या वतीने स्वेटरचे वाटप करण्यात आले.

अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त ऊसतोड कामगार बंधू भगिनींच्या कुटुंबांना दिवाळीसाठी आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. हे वाटप करत असताना एक गोष्ट निदर्शनास आली. त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक कुटुंबात किती मुले व त्यांचा वयोगट याची यादी तयार केली. अभंग प्रतिष्ठानला कायमच मार्गदर्शन व सहकार्य करणारे किरीटी शामकांत मोरे यांच्याशी यासंबंधी संवाद साधला. त्यांनी या मुलांसाठी स्वेटर भेट दिली.

20 नोव्हेंबर हा दिवस किरीटी मोरे यांचे वडील श्रीक्षेत्र देहूचे थोर सुपुत्र, थोर स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार वै.शामकांत दामोदर मोरे यांचा स्मृतिदिन. या स्मृती दिनाचे औचित्य साधून मोरे यांनी अभंग प्रतिष्ठानकडे ऊस तोड कामगार बंधू भगिनींच्या मुलांसाठी स्वेटर उपलब्ध करून दिली. हा स्वेटर वाटपाचा कार्यक्रम ऊसतोड कामगार बंधू भगिनींच्या राहत्या ठिकाणी सांगुर्डी येथे शनिवारी संपन्न झाला. या ठिकाणी 29 स्वेटरचे वाटप करण्यात आले. यावेळी सांगुर्डी गावचे ग्रामस्थ, अभंग प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply