Pimpri corona News: शहरात आज 192 नवीन रुग्णांची नोंद, 173 जणांना डिस्चार्ज, पाच मृत्यू

Pimpri corona News: शहरात आज 192 नवीन रुग्णांची नोंद, 173 जणांना डिस्चार्ज, पाच मृत्यू
Pckhabar-   पिंपरी-चिंचवड शहराच्या  विविध भागातील 192 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 173 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 90 हजार 481 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 87 हजार 171 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1586 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 656 अशा  2242 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 648 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1107 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. 

शहरातील चार आणि पालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये आळंदीरोड येथील 55
वर्षीय पुरुष, आकुर्डीतील 75 वर्षीय वृद्ध महिला, काळेवाडीतील 65 वर्षीय महिला, पिंपरीतील 84 वर्षीय वृद्ध महिला आणि पालिका हद्दीबाहेरील तळेगाव रोड येथील 62 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *